प्युअर सॉलिवुड फिल्म: पुन्हा एकदा चौरंग


 

प्युअर सॉलिवुड फिल्म: ‘पुन्हा एकदा चौरंग

Advertisement

 ‘पुन्हा एकदा चौरंग ‘ चित्रपट प्रदर्शित झाला. सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन..!
प्युअर सॉलिवुड फिल्म निर्माण करणार्या आरोही फिल्म चे अभिनंदन..!
मराठी भाषेत मुलींवरील अत्याचार आणि त्यावर सकारात्मक संदेशप्रधान रहस्य ,थरारपट हा विषय अपवादात्मक आला आहे. मात्र विषय ज्वलंत आणि सध्याच्या दिवसात थेट हृदयाला भिडणारा. तुम्ही (आरोही टिमने) विषयाची दाहकता अत्यंत संयमी शब्दात, स्पष्ट, थेट पण संयतपणे मांडली आहे. छ.शिवाजी महाराज यांची राज्यकारभार पध्दत अधोरेखित केली आहे.मुलींनी निर्भय व्हावं,आपल्यातल्या ताकदीला ओळखावं. परिस्थिती बिकट, बिघडलेली आहे पण निराश होण्याचे कारण नाही.छत्रपती शिवरायांच्या विचारांची शिदोरी परिस्थिती बदलू शकते हा लखलखीत आशावाद तुम्ही देताय.मुलींमध्ये तुम्ही सगळे उर्जा निर्माण करत आहात.हॅटस् आॅफ..!
विशेषतः सागरजींचे दिग्दर्शनही भीषणता दाखवणारे पण पाशवी किंवा सवंगतेकडे न जाणारे आहे.यासाठी दिग्दर्शकांचे अभिनंदन व कौतुक.
(तसे गल्लाभरु प्रसंग असतानाही निर्माते दिग्दर्शक यांनी टाळले , यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!) अभिनेत्रींचे खूप मोठे वलय असलेले चेहरे नाहीत . मात्र सर्वांच अभिनय उत्तम.
नारीशक्ती काय करू शकते हे उत्तम पद्धतीने दाखवले आहे. म्हणजे अपंग, शारीरिक दृष्ट्या असली तरी मनाने सर्वात कणखर असणारी व्यक्ती काय घडवू शकते हे अप्रतिम दाखवले आहे.
कॅमेरा ,दिग्दर्शन, संगीत ,इफेक्ट्स सगळेच हिंदीमधील ए ग्रेड चित्रपटाप्रमाणे खूप सुंदर.! दर्जा असलेले.
देशमुख साहेब( निर्माते) यांचे कौतुक खूप अभिनंदन.! त्यांनी उचललेले पाऊल आता अथक वाटचालीत रूपांतरित व्हावे आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती त्यांच्याकडून होत राहावी ही अपेक्षा .
खऱ्या अर्थाने साताऱ्याचे लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, संगीत ,चित्रपटातील स्थळे, कलाकार यांच्यामुळे
*प्युअर सॉलिवुड फिल्म*
असे मी या निर्मितीला मानतो. चित्रपट उत्तम आहे. कौतुकास्पद आहे.
💐
पुन्हाएकदा
सर्व टिम,निर्मात्यांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!
💐💐💐


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!