दैनंदिन राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन शुक्ल द्वादशी, सोमवार, दि. १४ ऑक्टोबर २०२४, चंद्र – कुंभ राशीत, नक्षत्र – शततारका, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३४ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १५ मि.

नमस्कार आज चंद्र कुंभ राशीत रहाणार आहे. आज क्षयतिथी वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – शनि युतियोग, रवि – गुरु केंद्रयोग, रवि – मंगळ केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल आज उत्तम असल्याने आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कामाचा ताण कमी करणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. आनंददयी घटना घडेल.

मिथुन : तुमच्या मतांवर तुम्ही ठाम रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

कर्क : कामाचा ताण राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. निरुत्साही राहणार आहात. आपण आज महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. अकारण मनस्ताप होणार आहे. विलंब अनुभवाल.

सिंह : तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक ताण तणाव कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. प्रवास होणार आहेत.

Advertisement

कन्या : तुमच्या मनामध्ये आज नकारात्मक विचार राहतील. आपण मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल.

तुळ : संततीसौख्य लाभेल. तुम्ही आज अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्याच्या तक्रारी आज कमी असणार आहेत. आज तुम्ही आनंदी असणार आहात. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामास विलंब लगला तरी कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज आपण अनेकांना सहकार्य करणार आहात.

धनु : प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. काहींना नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी सुसंवाद साधाल. भाग्यकारक अनुभव येतील.

मकर : काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आपली कौटुंबिक कामे आज मार्गी लावणार आहात. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : प्रवासाचे योग येणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. आज तुम्हाला अनेक कामात सुयश लाभणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत.

मीन : मानसिकता द्विधा राहील. काहींना एकटेपणा जाणवणार आहे. तुमच्या मनात काही अनावश्यक विचार राहतील. आपण मात्र शांत व संयमी रहावे. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे.

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!