पुस्तकाचं कथन
रस्त्यावरून
जाताजाता
एक पुस्तक थबकलं..
जिंदगीकी खुली किताब के पंन्नेपर
दस्तक देतं झालं…
विचारलं,
“कशी आहेस गं बाई तू.?
ठीक आहे ना सगळं.?”
हसकर बोली जिंदगी,
“अनगिनत यादे
नाम, बेनाम किरदार..
मिठे ख्वाब..
छुटे सपने..
आठवणीतले क्षण..
हिरमुसलं मन..
गर्दीतली शांतता जीवघेणी..
एकट्याने म्हणलेली समूहगाणी..
हंसी, मजाक, मायुसी..
सुलझे रिस्ते
टेढे नाते..
बिखरे अरमा..
भुले रस्ते..
कुछ खट्टी
कुछ मिठी
कुछ कडुवी बाते..
और..
और भी..
कुछ कहे
कुछ अनकहे
किस्से….!”
“मग, पुढे.?”
पुस्तकानी विचारलं..
“मग..?
मग काय..
मग वाटते भीती..
ये रंगीन पंन्ने
सिमट न जाये
बसं ऐसे भुल न जाए
कोई पढेबिनाही
देखकर जाए…
डर लगता है
और
एक किताब ना बने
जे
केवळ सजवेल
एखाद्या कपाटाला..
आणि
कारणीभूत होईल
माझ्या जिवंत समाधीला..!
.
मधुसूदन पतकी
जागतिक पुस्तकं दिना निमित्त
(गुगलकृपा)