भाजपची पहिली यादी जाहीर..! शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार गोरे, अतुल भोसले यांना उमेदवारी

भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
शिवेंद्रसिंहराजे , जयकुमार गोरे , अतुल भोसले यांची उमेदवारी घोषित
मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं राजकीय पक्षांचे बिगुल खऱ्या अर्थाने आज वाजले आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली जाहीर झाली आहे.यादीत सातारा जिल्ह्यातील सातारा , माण -खटाव कराड आणि दक्षिण विधानसभा मतदार संघातील नावे जाहीर झाली आहेत. यात विद्यमान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , आ. जयकुमार गोरे आणि डॉ. अतुल भोसले यांची नावे निश्चित झाली आहेत.
दरम्यान, भाजपकडून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली . या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.बल्लारपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार लोकसभेसाठी चंद्रपूर मतदार संघातून उमेदवार होते मात्र ते पराभूत झाले होते.
सातारा जिल्ह्यातील भाजपच्या चार पैकी तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत . कराड उत्तर या विधान सभेसाठी मनोज घोरपडे आणि भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यात रस्सी खेच आहे . एकवेळ पक्षाचा आदेश म्हणून धैर्यशील कदम माघार घेतील मात्र मनोज घोरपडे यांना उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात लढणार आहेत. हा गुंता सोडवणे सध्या सहज सोपे नाही याची कल्पना देवेंद्र फडणवीस , चन्द्रशेखर बावनकुळे यांना आहे. त्यामुळे आज जाहीर झालेल्या जागेवर कराड उत्तर चा उमेदवार जाहीर केला नाही.
दुसऱ्या बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या तीन निवडणुकीचा विचार केला तर तिन्ही निवडणूक भक्कम मतांनी जिकल्या आहेत. पैकी २००९ व २०१४ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिन्हावर म्हणजे घड्याळावर जीवकली होती तर २०१९ ची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर जिंकली होती. आज ही त्यांच्या समोर तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे हि जागा जाणार असून सध्या तरी शरद पवार यांच्या पुढे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तगडे आव्हान देईल असा उमेदवार नाही.
जयकुमार गोरे हे माण – खटावचे आमदार आहेत. ते हि सलग तीन वेळा याच मतदार संघातून निवडणूक जिकंले आहेत. विशेष म्हणजे तीनवेळा तीन वेगवेगळ्या पक्षातून म्हणजे एकदा अपक्ष , एकदा काँग्रेस तर गेली निवडणूक भाजपच्या चिन्हावर ते जिकंले आहेत. येथे शरद पवार हे प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर कराड दक्षिण येथून अतुल भोसले आपल्या पहिले विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या पुढे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस चे वजनदार उमेदवार पृथ्वीराज चव्हाण हे प्रतिस्पर्धी असतील. पृथ्वीराज चव्हाण यांनी सलग दोनवेळा विजय प्राप्त केला आहे तर केंद्रात हि त्यांची वजनदार कामगिरी आहे. या शिवाय वाई, फलटण हे मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे आहेत तर कोरेगाव आणि पाटण हे दोन मतदार संघ शिवसेना शिंदे पक्षाकडे आहेत. खरे तर कोरेगाव मतदार संघाचे सध्याचे आमदार महेश शिंदे हे मूळचे भाजप चे आहेत मात्र गेल्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेने भाजपला दयायला नकार दिला होता मात्र त्यांच्याकडे उमेदवार नव्हता सबब महेश शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश देत भाजपने ही जागा लढली होती. यावेळी ही हेच सूत्र कायम राहील यात शंका नाही . महेश शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वसू म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी बाबत प्रश्न निर्माण होणार नाही. पाटण येते पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उमेदवारी नक्की आहे. ते आज पर्यंत तीन वेळा या मतदार संघातून विजयी झालेत तर सलग २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला होता. सत्यजित पाटणकर हे शरद पवार यांचे अनुयायी आहेत. त्यांनाही विजयाची प्रतीक्षा आहे. मात्र विजय सहज सोपा आजीबात नाही.
वाईत मकरंद पाटील यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार होते. आता ते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या बरोबर आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या बंधूंना नितीन पाटील यांना राज्यसभेचे सभासदत्व दिले आहे. त्यातून मकरंद पाटील यांना ही तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी नाही. स्व. प्रतापराव भोसले यांचे नातू नितीन पाटील यांच्या विरोधात लढतील अशी शक्यता आहे. तर फलटण येथील जागा अजित पवार यांचेकडे होती . दीपक चव्हाण हे फलटण चे आमदार आहेत. मात्र त्यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेवर नवा उमेदवार शोधणे हे आव्हान अजित पवार यांच्यापुढे आहे. त्यातून ही जागा राखीव एस सी प्रवर्गातली आहे. त्यामुळे उमेदवार मिळवून त्याला फलटणांत प्रस्थापित करणे सोपे नाही. तसेच रामराजे, संजीवराजे यांच्या ताकदीपुढे सहज विजय मिळवणे सोपे नाही. एक आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याची साथ मिळाली तर दीपक चव्हाण याना विजय मिळवन्यायासाठी कष्ट घ्यावे लागतील.