आजचा दिवस


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – मृग, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४९ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५९ मि.

नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस रात्री ८ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि -चंद्र षडाष्टकयोग, चंद्र – शुक्र प्रतियोग व बुध – गुरु प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ,मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कर्क, वृश्चिक व मकर या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : मानसिक उत्साह विशेष असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. आपल्याला अपेक्षित असणारे फोन, ई-मेल येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी लाभणार आहे, प्रवास सुखकर होतील.

वृषभ : आपले मनोबल उत्तम असणार आहे. कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी राहील. आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. काहींना गुप्तवार्ता समजतील. तुमच्यावर असणारा कामाचा ताण कमी होईल.

मिथुन : आपला उत्साह वाढणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील. आज आपण इतरांना सहाय्य करणार आहात. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही सहजपणे पार पाडणार आहात.

कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतील. दानधर्म कराल. विरोधक व हितशत्रुंवर मात करणार आहात. आज अकारण वादविवाद टाळावेत. प्रवासात काळजी घ्यावी.

सिंह : काहींना विविध लाभ होणार आहेत. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहात. तुमचे मनोबल उत्तम राहील. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. वैचारिक परिवर्तन होईल.

Advertisement

कन्या : आपले मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम असणार आहात. मानसिक प्रसन्नता राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात.

तुला : आज आपण विशेष जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचे मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. काहींना व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल.

वृश्चिक : आपले मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. आज तुमची अनावश्यक दगदग व धावपळ होईल. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवतील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही इतरांना सहकार्य करणार आहात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. सौख्य व समाधान लाभेल.

मकर : आज तुम्हाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. काहींची चिडचिड होणार आहे. आज आपल्याला प्रतिकुलता जाणवणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत.

कुंभ : तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे.

मीन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपल्या कामामध्ये खुश राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात.

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!