आजचा दिवस: राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक कृष्ण दशमी, सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४, चंद्र – कन्या राशीत, नक्षत्र – उत्तरा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५३ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५८ मि.
नमस्कार आज चंद्र कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दु. १२ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग ,चंद्र – मंगळ लाभयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु , मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : शांत व संयमी रहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. खर्च वाढणार आहेत.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. विशेष प्रसन्नपणे कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील रहाल.
कर्क : नातेवाईक भेटणार आहेत. उचित मार्गदर्शन लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. जिद्दीने काम करणार आहात. आनंदी राहणार आहात.
सिंह : कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक कामा संदर्भातील चर्चा सफल होईल.
कन्या : विशेष उत्साही रहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.
तुला : मनोबल कमी राहील. आज आपणाला कसली न कसली चिंता लागून राहणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात करू शकणार आहात.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. सन्तातिसौख्य लाभेल. काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सल्ला मसलत कराल.
धनु : तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक कामे होतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी तुम्हाला लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. सध्या आपण ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करत रहावे. संयमी रहावे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत . प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४