आजचा दिवस: राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक कृष्ण षष्ठी, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दु. ३ वा. ३६ मि. पर्यंत, गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर २०२४, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य दु. ३ वा. ३६ मि. पर्यंत नंतर आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५१ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५८ मि.

नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सायं. ५ वा. पर्यंत चांगला दिवस आहे. आज चंद्र – गुरु लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल असणार आहे.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : आज आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : नवीन मार्ग दिसेल. नोकरीमध्ये अपेक्षित सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक ताकद वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.

मिथुन : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आज प्रसन्नतेचे व आनंदाने भारलेले राहील. काहींना अनपेक्षितपणे एखादी सुवार्ता समजेल.

कर्क : मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे व सुसंवादाचे वातावरण राहील. तुमचा प्रभाव वाढेल.

सिंह : मानसिक उद्विग्नता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. एखाद्या वबातीत आज आपल्याला मानसिक त्रास संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना दक्षता घ्यावी.

Advertisement

कन्या : आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने आज तुम्ही आनंदी रहाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुला : नोकरी व व्यवसायातील अपेक्षित कामे आज आपण विनासायास मार्गी लावू शकणार आहात. मनोबल वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताण कमी होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : मानसिक ताण तणाव राहतील. अनावश्यक होणारे वाद विवाद त्रास देतील. आज आपण शान्त व संयमी रहावे. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. काहींना आर्थिक लाभ होतील.

मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : आर्थिक कामात दक्षता घ्यावी. मनोबल कमी असणार आहे. आज आपल्याला अनावश्यक कामात आपला वेळ खर्च करावा लागणार आहे. काहींना आज कामे नकोशी होतील.

मीन : काहींचा बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. आज आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. तुमचे व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल वाढणार आहे.

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!