राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक कृष्ण चतुर्दशी स. १० वा. ३० मि. पर्यंत नंतर अमावस्या, दर्श अमावस्या, शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०२४, चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – विशाखा दु. १२ वा. ३५ मि. पर्यंत नंतर अनुराधा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५६ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५९ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस अमावस्या वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – मंगळ त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे नकोत. काहींना विनाकारण एखादी चिंता सतावणार हे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वादविवादात सहभाग टाळावा. अकारण एखादा मनस्ताप संभवतो.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : अकारण कोणत्याही गोष्टीची चिंता करु नये. मन शांत ठेवावे. आपली विनाकारण चिडचिड होणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनपेक्षितपणे कोणतातरी दंड भरावा लागेल.
कर्क : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींचे नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. विविध लाभ होतील.
सिंह : मनोबल उत्तम राहील. तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
कन्या : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. तुमची जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
तुळ : आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. व्यवसायिकांना आजचा दिवस विशेष लाभाचा ठरेल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव पडणार आहे. वैचारिक प्रगती होईल.
धनु : मानसिक अस्वस्थता असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात रस वाटणार नाही. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर : अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल चांगले असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : आजचा दिवस आपल्याला अनेकबाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमच्या कामाची गती विशेष असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. तुमची अपेक्षित प्रगती तुम्ही साध्य करणार आहात. काहींना गुरुकृपा लाभेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट देणार आहात. प्रवास सुखकर होतील.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054