मासिक राशिभविष्य – डिसेंबर २०२४
मासिक राशिभविष्य – डिसेंबर २०२४
मेष – प्रभाव वाढेल.
आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या पत्रिकेत शनी अकराव्या स्थानी, राहू बाराव्या स्थानी, केतू सहाव्या स्थानी, मंगळ चौथ्या स्थानी, शुक्र दहाव्या स्थानी, बुध आठव्या स्थानी तर रवि आठव्या व नवव्या स्थानी असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आपला सर्वत्र प्रभाव असणार आहे. तुमची मानसिकता अनेक बाबतीत सकारात्मक असणार आहे त्यामुळे येणाऱ्या या महिन्यात अनेक कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. महिन्याचा उत्तरार्ध आपणाला अनेक दृष्टीने विशेष अनुकूल असणार आहे. आगामी महिन्यात, आपली बरेच दिवस रखडलेली शासकीय कामे मार्गी लागणार आहेत. नोकरी व व्यसयात तुमच्या कामाची दखल घेतली जेल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुमचे मनोबल उत्तम असल्याने तुम्ही सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी असणार आहात. सार्वजनिक कामात तुम्हाला मानसन्मान लाभेल. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये भर टाकणारी घटना घडेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आगामी महिना अनुकूल असणार आहे. आगामी महिन्यात मात्र काहीवेळा आपले आपल्या नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांचे सहकार्य कमी राहील. आगामी महिन्यात प्रवासाचे विशेष योग येतील व आपले प्रवास सुखकर होतील. एकूणच, आगामी महिना हा आपल्याला अनेकबाबतीत अनुकूल असणार आहे.
अनु. दि.३,४,५,६,७,८,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२५,२६,३०,३१
वृषभ – प्रवास होतील.
आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या पत्रिकेत शनी दहाव्या स्थानी, राहू अकराव्या स्थानी, केतू पाचव्या स्थानी, मंगळ तिसऱ्या स्थानी, शुक्र नवव्या स्थानी, बुध सातव्या स्थानी तर रवि सातव्या व आठव्या स्थानी असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य चांगले राहणार आहे. गेले महिनाभर आपल्याला जाणवत असणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आता कमी होणार आहेत. आपले मनोबल वाढणार आहे. आपली मानसिकता सकारात्मक होणार आहे. आपल्याला मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना आगामी महिन्यात घडणार आहेत. विवाहेच्छूक तरुण तरुणींचे विवाह जमून येण्यासाठी आगामी महिना अनुकूल असणार आहे. आगामी महिन्यात आपले काही नवीन परिचय होतील. नवीन ओळखी होतील व त्या ओळखीचं आपल्याला भविष्यात फायदा होईल. आगामी महिन्यात आपली सर्व शासकीय कामे, सरकारी कामे तसेच आपल्या वरिष्ठांकडे आपली असणारी कामे आपण शक्यतो महिन्याच्या पूर्वार्धात करावीत. महिन्याच्या उत्तरार्धात काहींचे वरिष्ठांशी मतभेद राहतील. आगामी महिना आपल्याला प्रवसाकरिता विशेष अनुकूल असणार आहे. प्रवासात आपल्याला आनंद मिळेल. आपले प्रवास सुखकर होतील. एकूणच आगामी महिना आपल्याला अनेकबाबतीत अनुकूल असणार आहे.
अनु. दि. ५,६,७,८,९,१०,११,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२८,२९
मिथुन – मनोबल कमी राहील.
आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या पत्रिकेत शनी नवव्या स्थानी, राहू दहाव्या स्थानी, केतू चौथ्या स्थानी, मंगळ दुसऱ्या स्थानी, शुक्र आठव्या स्थानी, बुध सहव्या स्थानी तर रवि सहाव्या व सातव्या स्थानी असणार आहे. आगामी महिना आपल्याला आरोग्याच्यादृष्टीने फारसा अनुकूल नाही. आगामी महिन्यात आपले मनोबल कमी असणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी महिन्यात आपण आपल्या आरोग्यासाठी विशेष जागरूक रहावे. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करु नये. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे. आगामी महिन्यात आपण कोणत्याही बाबतीत अतिताण घेऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करु नये. आगामी महिन्यात आपण आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. आपली मानसिकता सकारात्मक ठेवावी. आगामी महिन्यात आपण प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. त्याचप्रमाणे आगामी महिन्यात आपण महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. व्यवसायात कोणतेही अंदाज लावू नयेत. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी.
अनु. दि. ३,४,७,८,९,१०,११,१२,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,३०,३१