आजचा दिवस: राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया, मंगळवार, दि. ३ डिसेंबर २०२४, चंद्र – धनु राशीत, नक्षत्र – मूळ दु. ४ वा. ४२ मि. पर्यंत नंतर पूर्वाषाढा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५८ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५९ मि.
नमस्कार आज चंद्र धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चंद्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ व मीन या राशींया अनुकूल तर वृषभ, कर्क व मकर या राशींना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : उत्साह व उमेद वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वासाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताकद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.
वृषभ : मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.
मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात. आरोग्य सुधारेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कर्क : खर्च वाढणार आहेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रवास आज नकोत. एखादी मनस्तापदायक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.
सिंह : तुमच्या प्रियजनांशी तुम्ही वार्तालाप करु शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात.
कन्या : मानसिक ताकद वाढेल. तुम्ही आज विशेष आशावादी असणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
तुळ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक : आर्थिक कामे पूर्ण होणार आहेत. कौटूंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धनु : गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. आरोग्य सुधारणार आहे. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
मकर : मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार जपून करावेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही.
कुंभ : काहींना विविध लाभ होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आता हळुहळू तुमची तुमच्या आकांक्षापूर्तीकडे वाटचाल सुरु होणार आहे. सकारात्मक अनुभव येईल.
मीन : मनोबलाच्या जोरावर अनेक कामे पूर्ण करणार आहात. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. सार्वजनिक कामात तुमचा सकारात्मक सहभाग असणार आहे.
आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४