मासिक राशिभविष्य
https://www.facebook.com/share/p/1AwpN9f4ju/
गार्गी ज्योतिषालय,संभाजीनगर, सातारा 098223 03054
मासिक राशिभविष्य – डिसेंबर २०२४
कर्क – जिद्द वाढेल.
आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनि आठव्या स्थानी, गुरु अकराव्या स्थानी, राहू नवव्या स्थानी, केतू तिसऱ्या स्थानी, मंगळ पहिल्या स्थानी, शुक्र सातव्या स्थानी, बुध पाचव्या स्थानी, रवि पाचव्या व सहाव्या स्थानी याप्रमाणे ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपल्या पत्रिकेत मंगळ प्रथमस्थानी असणार आहे. आपल्याला आपल्या आरोग्याच्या काही तक्रारी जाणवणार आहेत. विशेषतः आगामी महिन्यात आपल्याला काही उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याची आपण काळजी घ्यावी.आपण आपल्या आहारविहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आगामी महिन्यात आपण अधिक जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. आपले मनोबल विशेष असणार आहे. आगामी महिन्यात काहीवेळा आपण काही बाबतीत खूपच हटवादी भूमिका घेणार आहात. आपण आपल्या मतांवर ठाम रहाल. आपले बोलणे व आपल्या प्रतिक्रिया या स्पष्ट व परखड असणार आहेत व त्याचा आपल्याला काही ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. आगामी महिन्यात आपण शांत व संयमी राहणे गरजेचे आहे. आगामी महिन्यात काहीवेळा आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनात मतभेदाना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महिन्याचा पूर्वार्ध आपणाला प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे करण्याकरिता अनुकूल असणार आहे. आपल्याला आपल्या कामासाठी नवी सुसंधी लाभणार आहे. आगामी महिन्यात आपण प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
अनुकूल दि. ५,६,१०,११,१४,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९
मासिक राशिभविष्य – डिसेंबर २०२४
सिंह – उत्साही रहाल.
आगामी डिसेंबर महिन्यात, आपल्या राशिपत्रिकेत गुरु दहाव्या स्थानी, राहू आठव्या स्थानी, केतु दुसऱ्या स्थानी, शनी सातव्या स्थानी, मंगळ बाराव्या स्थानी, बुध चौथ्या स्थानी, रवि चौथ्या व पाचव्या स्थानी तर शुक्र सहाव्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपण अधिक उत्साही राहणार आहात. आगामी महिन्यात आपल्याला काही उत्साहवर्धक घटना अनुभवता येणार आहेत. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण आगामी महिन्यात विशेष उत्साही व आनंदी असणार आहात. कामाचा ताण व व्याप असला तरी ती कामे तुम्ही तुमच्या कौशल्याने पूर्ण करणार आहात. आपले मनोबल उत्तम राहील. काहीवेळा आपण आपल्या मतावर ठाम रहाल किंवा आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आगामी महिन्यात आपण आपल्या कार्यक्षेत्रात विशेष उत्साहाने कार्यरत रहाणार आहात. महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर तुमचा विशेष सुसंवाद राहील. महिन्याच्या उत्तरार्धात आपण प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी, शक्य असल्यास महिन्याच्या उत्तरार्धात दूरवरचे प्रवास करण्याचे टाळावे. आगामी महिन्याच्या उत्तरार्धात आपले आपल्या नातेवाईक व भाऊ बहीण यांच्याबरोबर काही मतभेद होण्याची शक्यता आहे.
अनुकूल दि. ३,४,७,८,१२,१३,१४,१५,१६,१७,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१.
मासिक राशिभविष्य – डिसेंबर २०२४
कन्या – चिकाटीने कार्यरत रहाल.
आगामी डिसेंबर महिन्यात, आपल्या राशिपत्रिकेत गुरु नवव्या स्थानी, राहू सातव्या स्थानी, केतु पहिल्या स्थानी, शनी सहाव्या स्थानी, मंगळ अकराव्या स्थानी, बुध तिसऱ्या स्थानी, रवि तिसऱ्या व चौथ्या स्थानी तर शुक्र पाचव्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपला उत्साह व उमेद वाढणार आहे. आपण अधिक जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. आपण आपल्या प्रत्येक कामात विशेष उत्साहाने सहभागी होणार आहात. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. तुमची मानसिकता ही अत्यन्त सकारात्मक असणार आहे. आगामी काळात तुम्हाला विशेष आत्मविश्वासपूर्वक आपली कामे पूर्ण करता येणार आहेत. आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला शासकीय कामात सुयश लाभणार आहे. सार्वजनिक व सामाजिक कार्यात तुमचा विशेष सहभाग रहाल. मानसन्मान लाभेल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात उचित संधी लाभेल व तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. सर्वत्र तुमचा प्रभाव व दबदबा राहील. आगामी महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला विशेष आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुम्हाला अनेक बाबतीत अनुकूलता प्राप्त करुन देणारा हा महिना असणार आहे. प्रवास सुखकर होतील.
अनु. दि. ३,४,५,६,१०,११,१४,१५,१६,१७,१८,१९,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१
(उद्या तुला, वृश्चिक व धनु )