मासिक भविष्य
मासिक राशिभविष्य – डिसेंबर 2024
तुला – अधिकारपद लाभेल.
आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत गुरु आठव्या स्थानी, राहू सहाव्या स्थानी, केतू बाराव्या स्थानी, शनी पाचव्या स्थानी, मंगळ दहाव्या स्थानी, बुध दुसऱ्या स्थानी, रवि दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी तर शुक्र चौथ्या स्थानी याप्रमाणे ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आपली शासकीय कामे पूर्ण होतील. काहींना शासकीय कामात आर्थिक लाभ होतील. आपण जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपली अनेक कामे मार्गी लावणार आहात. आगामी महिन्यात आपला सार्वजनिक व सामाजिक कार्यात विशेष सहभाग राहील. आपल्याला उचित मानसन्मान लाभेल. आपल्या कार्याचा उचित गौरव होईल. आपल्यावर असणारा ताण आपण कमी करु शकणार आहात. आगामी महिन्यात आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. नोकरी व व्यवसायात आपली पकड आपण अधिक मजबूत करु शकणार आहात. नोकरीमध्ये आपल्याला अधिकारपद लाभेल. आपण घेत असलेल्या कष्टाचा आपल्याला योग्य तो मोबदला मिळेल. आगामी महिना आपल्याला प्रवासाकरिता अनुकूल असणार आहे.
अनु. दि. ३,४,५,६,७,८,१२,११६,१७,१८,१९,२०,२१,२५,२६,२७,२८,२९,३०,३१
वृश्चिक – आरोग्य सुधारेल.
आगामी डिसेंबर महिन्यात, आपल्या राशिपत्रिकेत गुरु सातव्या स्थानी, राहू पाचव्या स्थानी, केतु अकराव्या स्थानी, शनी चौथ्या स्थानी, मंगळ नवव्या स्थानी, बुध पहिल्या स्थानी, रवि पहिल्या व दुसऱ्या स्थानी तर शुक्र तिसऱ्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य सुधारणार आहे. आपल्या आरोग्याच्या तक्रारी आगामी महिन्यात कमी होतील. आपल्याला मानसिक प्रसन्नता देणारी घटना महिन्याच्या उत्तरार्धात घडेल. आगामी महिन्याच्या पूर्वार्धात आपण आर्थिक बाबतीत सावधानता ठेवावी. आपण आर्थिक व्यवहारात दक्षता घ्यावी. उधारी उसनवारी व आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. आगामी महिन्यात आपले आपल्या सहकाऱ्यांबरोबर किंवा आपले मित्र मैत्रिणी याबरोबर मतभेदाचे प्रसंग येणार आहेत. एखाद्या गोष्टीवरून त्यांच्या बरोबर आपले वादविवाद होणार आहेत. त्याबाबतीत आपण काळजी घ्यावी. आगामी महिन्यात आपल्याला आपल्या नातेवाईकांकचे विशेष सहकार्य लाभेल. आपले मनोबल उत्तम राहील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात आपली रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. महिन्याचा उत्तरार्ध आपणाला आर्थिक दृष्ट्या अनुकूल असणार आहे.
अनु. दि. ३,४,५,६,७,८,९,१०,१४,१५,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२८,२९,३०,३१
धनु – आर्थिक लाभ
आगामी डिसेंबर महिन्यात, आपल्या राशिपत्रिकेत गुरु सहाव्या स्थानी, राहू चौथ्या स्थानी, केतु दहाव्या स्थानी, शनी तिसऱ्या स्थानी, मंगळ आठव्या स्थानी, बुध बाराव्या स्थानी, रवि बाराव्या व पहिल्या स्थानी तर शुक्र दुसऱ्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्याच्या पूर्वार्धात आपले मनोबल कमी राहणार आहे. आपल्याला आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहणार आहेत. खर्च वाढणार आहेत. विनाकारण काही बाबतीत आपल्याला मनस्ताप होणार आहेत. अनावश्यक काही कामात आपला वेळ वाया जाणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात आपले वैवाहिक जीवनात काही किरकोळ मतभेद होणार आहेत. काही बाबतीत आपल्याला विनाकारण गैरसमजाला सामोरे जावे लागणार आहे. आगामी महिन्यात आपण प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. हितशत्रू व विरोधक यांच्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या कामावर आपण आपले लक्ष केंद्रित करावे. आगामी महिन्याचा उत्तरार्ध आपणाला अनुकूल असणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात आपले मनोबल, आत्मविश्वास व उत्साह वाढविणारी घटना घडेल. व्यवसायातील आपली कामे आपण महिन्याच्या उत्तरार्धात मार्गी लावू शकणार आहात. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता आगामी महिन्यात आपण आपले काम करत रहावे. एकूणच, आगामी महिन्याचा उत्तरार्ध पणाला अनेक बाबतीत अनुकूल राहील.
अनुकूल दि. ३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१६,१७,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,३०,३१
उद्या मकर, कुंभ व मीन रास