आजचा दिवस


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, सोमवार, दि. १७ मार्च २०२५, चंद्र – तुला राशीत, नक्षत्र – चित्रा दु. २ वा. ४७ मि. पर्यंत नंतर स्वाती, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४८ मि.

नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सामान्य दिवस आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : काही अनपेक्षित अडचणी संभवतात. महत्त्वाच्या कामात काही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल कमी असणार आहे.

मिथुन : वेळेचा सदुपयोग कराल. प्रियजनांसाठी वेळ द्याल. तुम्हाला सुखावणार्‍या काही घटना घडतील. काहींना विविध लाभ होतील.

कर्क : आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. इतरांसाठी सहानुभूती राहील. कौटुंबिक जीवनात प्रसन्न वातावरण राहील.

सिंह : व्यापार व व्यवसायातील धाडसी निर्णय घ्याल. नवीन योजना आखाल. काहींना उचित असे मार्गदर्शन लाभेल.

Advertisement

कन्या : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. कौटुंबिक प्रश्‍नांना प्राधान्य देणार आहात. काळजी संपेल. प्रवास सुखकर होतील.

तुळ : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. एकाग्रतेने कार्य कराल. दैनंदिन जीवनात आनंदी देणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. अतिउत्साहीपणे व धाडसीपणाने कोणतेही कार्य कराल. प्रतिकूलता जाणवणार आहे. मनस्वास्थ्य कमी राहील.

धनु : व्यवसायातील आर्थिक निर्णय घ्याल. मित्रमैत्रिणींसाठी वेळ द्याल. अनपेक्षितपणे प्रियजन भेटतील. तुम्हाला सुखावणारी एखादी घटना घडेल.

मकर : तुम्हाला आनंद व प्रसन्नता देणारी घटना घडणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. चिकाटी वाढेल. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ : काहींना गुरूकृपा लाभणार आहे. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल व आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.

मीन : अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. अशांतता राहील. मनाची समजूत घालावी लागेल. कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात.

 

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!