आजचे राशिफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, चैत्र शुक्ल द्वितीया, बुधवार, दि. १० एप्रिल २०२४, चंद्र – मेष राशीत, नक्षत्र – भरणी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २६ मि. , सुर्यास्त- सायं. ६ वा. ५४ मि.
नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज चंद्र – मंगळ व चंद्र – शनि लाभयोग व चंद्र – गुरु युतीयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशीना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना अनुभवण्यास मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे आज आपण विनासायास पूर्ण करु शकणार आहात.
वृषभ : आज आपल्याला काही अनावश्यक कामे करावी लागणार आहेत व त्यामुळे आपली चिडचिड होणार आहे. मानसिक उद्विग्नता शांतता लाभू देणार नाही. वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
मिथुन : मित्रमैत्रिणीबरोबर आजचा दिवस आपण आनंदीपणाने व्यतीत करु शकणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकणार आहात. आर्थिक कामास आजचा दिवस विशेष आपणाला अनुकूल असणार आहे.
कर्क : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपल्याला कौटूंबिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल उत्तम राहील. प्रवसाकरिता आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.
कन्या : मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात काही अडचणी राहणार आहेत. आज आपण शांत व संयमी रहावे. प्रतिकुलतेचा सामना करावा. अकारण होणाऱ्या वादविवादाना टाळण्याचा प्रयत्न करावा.
तुळ : तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्यच्या तक्रारी कमी होणार आहेत.
वृश्चिक : विरोधक व हितशत्रुंवर मात करणार आहात. तुमच्या मनावर अनावश्यक दडपण राहील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये. अतिताण घेऊ नये. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. .
धनु : मुलामुलींच्या सौख्याकरिता प्रयत्नशील रहाल. आरोग्य उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे.
मकर : उत्साहाने कार्यरत राहून आज आपण अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कार्यात मानसन्मान लाभेल. प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : काहींना आज गुरुकृपा लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. भाग्यकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे.
मीन : काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.,
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४