आजचा दिवस


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण अष्टमी, बुधवार, दि. २२ जानेवारी २०२५, चंद्र – तुला राशीत, नक्षत्र – स्वाती, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २५ मि.

नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आज दिवस उत्तम दिवस आहे. आज चंद्र – शनि त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही हिमतीने आपली मते इतरांना ठामपणे पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. काहींचा वेळ व्यर्थ वाया जाणार आहे.

मिथुन : आनंदी रहाणार आहात. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. काहीजण जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे.

कर्क : सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करु शकणार आहात.

सिंह : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी प्रगती साध्य करु शकणार आहात. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवासात सौख्य लाभणार आहे.

Advertisement

कन्या : कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आर्थिक कामात सुयश लाभल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे.

तुळ : आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आनंददायी घटना घडेल. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. आज तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च टाळावेत. कामे नकोशी वाटतील.

धनु : आज तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असणार आहेत. तुमचा इतरांवर असणारा प्रभाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूलता लाभणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

मकर : तुमचा विशेष प्रभाव राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. मनोबल वाढणार आहे. आज काहींना गुरुकृपा लाभेल. एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवासात सुखद अनुभव येईल. जिद्द वाढेल.

मीन : मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. अस्वस्थता जाणवणार आहे. आज आपण कोणत्याही बाबतीत अतिताण घेऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचे टाळावे.

आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!