कोंडवे परिसरात युवकांवर गोळीबार
कोंडवे परिसरात युवकांवर गोळीबार झाल्याने खळबळ
एक्टिवा वरून आलेल्या अज्ञातांचे कृत्य परिसरामध्ये घबराट
सातारा दिनांक 27 प्रतिनिधी
सातारा मेढा रस्त्यावरील कोंडवे समर्थ नगर परिसरात दुपारी साडेतीनच्या दरम्यान येथील पेट्रोल पंप परिसरात एक्टिवा गाडीवरून आलेल्या दोन युवकांनी साताऱ्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या दोन युवकांवर गोळीबार केला .या गोळीबारामध्ये अमर गणेश पवार वय 21 (तामजाईनगर ) व श्रेयस सुधीर भोसले वय 22 रा मोळाचा ओढा हे दोघे जखमी झाले आहेत दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
गोळीबार प्रकरणानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा तात्काळ ॲक्शन मोडवर आले आहेत .साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले गेल्या दहा दिवसातील गोळीबाराचा हा दुसरा प्रकार आहे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .गोळीबार नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप उलगडलेले नाही .पोलिसांचे दोन पथके संबंधितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत
याबाबतची अधिक माहिती अशी गोळीबारात जखमी झालेले दोन तरुण आपल्या गाडीवरून मेढा येथे न्यायालयातील तारखेला हजर झाले होते .ती प्रक्रिया आटोपून ते पुन्हा साताऱ्याच्या दिशेने येत असतात कोंडवे गावाच्या परिसरातील समर्थ नगर हद्दीत पेट्रोल पंपा समोर अचानक मागून आलेल्या एक्टिवा गाडीवरील दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यांनी हातातील पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले अमर व श्रेयस या गोळीबारातून थोडक्यात बचावले मात्र गोळी चाटून गेल्याने दोघेही जखमी झाले पुढे स्विफ्ट गाडी आडवी असल्याने हल्लेखोर त्या परिस्थितीचा फायदा घेऊन तेथून पसार झाले .गोळीबाराची घटना कळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांनी पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे गोळीबाराचा हा थरारक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी सुद्धा या प्रकाराची माहिती घेत घटनास्थळाला भेट दिली या कॅमेऱ्यामध्ये विना नंबर प्लेटच्या एक्टिवा गाडीवरून आलेल्या दोन तरुणांनी जखमींवर गोळीबार केल्याचे दिसून येत आहे सातारा तालुका पोलीस ॲक्शन मोडवर आली असून या युवकांच्या शोधार्थ दोन पथके रवाना झाले आहेत
सातारा शहर परिसरात गेल्या दहा दिवसांमध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे गोळीबारासारखे प्रकार घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीच्या तपासाच्या सूचना दिली आहेत जखमींना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत