संजिवराजे याच्या निवासास्थनी आयटी विभागाचा छापा
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकरचा छापा, राष्ट्रवादीतील घरवापसीपूर्वी घडामोड घरावरही छापा
सातारा: सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं
आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी
आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही,अशी माहिती आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणं रघुनाथराजे नाईक निंबाळकर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहे. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.