राशिफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, माघ शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, भीष्माष्टमी, बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५, चंद्र – मेष राशीत, नक्षत्र – भरणी, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ३३ मि.
नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आज दिवस दु. २ नंतर चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, चंद्र -मंगळ लाभयोग, चंद्र – बुध केंद्रयोग व चंद्र – शनि लाभायोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आपले मनोबल उंचवणार आहे. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : आज काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. तर काहींचा करमणुकीकडे कल राहील. अनावश्यक ताण तणाव टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आज आपण शांत रहावे.
मिथुन : तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. प्रियजन भेटल्याने आज तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल. संततीसौख्य लाभेल. तुम्हाला अपेक्षित असणारा धनलाभ होईल.
कर्क : आज आपल्या कामाची विशेष दखल घेतली जाईल. आपल्या कामाचे विशेष कौतुक होईल. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल.
सिंह : काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
कन्या : आज तुमचे मन नाराज राहण्याची शक्यता आहे. कामे टाळण्याकडे आपला कल राहील. काहींना आज अनपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
तुळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय प्रगतीपथावर राहील. तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे. कामाचा विशेष उरक राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : अनावश्यक कामात आपला वेळ जात असल्याने आज आपली चिडचिड होणार आहे. काहींना आज मानसिक त्रास होईल. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. खर्च वाढणार आहेत.
धनु : संततीसौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. आज आपल्याला प्रियजनांशी विशेष सुसंवाद साधता येणार आहे. आपले मन आनंदी राहील. काहींना विविध ठिकाणी विविध लाभ होतील.
मकर : आज आपण विशेष उमेदीने कार्यरत राहणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल. आज आपली सर्वसमावेशक वृत्ती दिसून येईल. अनेक बाबतीत आजचा दिवस आपल्याला अनुकूल राहील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदवणार आहेत. अनेक बाबतीत आपल्याला आजचा दिवस अनुकूल असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. उत्साही राहील.
मीन : आज आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला विशेष अनुकूलता लाभणार आहे.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४