रिपाईचे जिल्हा प्रशासनास निवेदन
- प्राधिकरण पाईप चुकीची खुदाई करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
रिपाईचे जिल्हा प्रशासनास निवेदन
फोटो
सातारा / प्रतिनिधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामार्फत सातारा शहर व परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पुरवठा केला जातो. त्या बदल्यात नागरिक दर महिन्याला देयक अदा करतात. मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी ठेकेदाराच्या चुकीमुळे बॉम्बे रेस्टॉरंट नजीक जीवन प्राधिकरणाची पाईप फोडण्यात आली. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने राष्ट्रीय नेते दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक पाहता काही कामे करताना काळजीपूर्वक व तंत्रज्ञांना सोबत घेऊन काम करावे लागते. परंतु, या ठिकाणी अकुशल कामगारांना सोबत घेऊन पाईपलाईन टाकण्याचे काम होत असल्यामुळे जीवन प्राधिकरणाची पाईप फुटली व किमान पंधरा दिवस पुरेल एवढा पाणी वाया गेले आहे. एवढं पाणी वाया जावूनही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सौजन्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना दाखवलं नाही.
या निवेदनदनावर विजय ओव्हाळ, किरण ओव्हाळ, किशोर इंगळे, गौतम चंदनशिवे, आशाक ताकपिरे, राकेश जाव, प्रदीप ओव्हाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.