साताऱ्यात पाणीपुरवठा दि.5 रोजी बंद
पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद
सातारा दि. (जि.मा.का.) – सातारा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईप लाईन टाकणेसाठी ड्रिल घेतेवेळी गॅस पाईपचे काम करणाऱ्या एजन्सीकडुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता फुटलेली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. आवश्यक साहित्य पुणे येथुन उपलब्ध करावे लागत असल्याने काम पुर्ण होण्यास 10 ते 15 तास लागणार आहेत. यामुळे शहरातील सदर बझार परीसर, संपुर्ण गोडोली परीसर, शाहुनगर, केसरकर पेठ, करंजे परिसर,पोवई नाका, एस.टी.स्टँड परीसर, जिल्हा परीषद परिसर या भागातील पाणीपुरवठा दि. 5 फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाही. तरी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरुन प्राधिकरणास सहकार्य करण्याचे आवाहन जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे.
000