पुणे जाहीर सभा
अपेक्षाभंगामुळे मतदान
घटत आहे
_ प्रकाश आंबेडकर
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दहा वर्षांच्या कारभारात जनतेचा अपेक्षाभंग केल्याने लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घटत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे शिरूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अन्वर शेख आणि पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर यांच्या सभा रविवारी झाल्या.
२०१४ सालापासून आजपर्यंत १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले. राज्यसभेत सरकारकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, नागरिकत्व का सोडले याची कारणे मोदी सरकारने दिलेली नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संथ, हिंदू महासभेने या मागील कारणे सांगावीत ,असे आंबेडकर म्हणाले. मोदी सरकार वसुली सरकार आहे, त्याच्या जाचाला कंटाकून १७ लाख कुटुंबे देश सोडूनच नव्हे तर नागरिकत्व सोडून गेले , असे मत आंबेडकर यांनी मांडले. निवडणुकीत मोदी परत सत्तेवर आले तर त्यांचा जाच व्यापारी वर्गाला होईल, असे भाकीत त्यांनी केले. कर्जाच्या ओझ्याखाली देश दबला आहे. आर्थिक घसरण सावरण्यासाठी मोदी सरकार व्यापाऱ्यांच्या मागे लागेल, असे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले.