राशीफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, चैत्र कृष्ण त्रयोदशी, सोमवार, दि. ६ मे २०२४, चंद्र – मीन राशीत सायं. ५ वा. ४३ मि. पर्यंत नंतर मेष राशीत, नक्षत्र – रेवती सायं. ५ वा. ४३ मि. पर्यंत नंतर अश्विनी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ०९ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. ०२ मि.
नमस्कार आज चंद्र मीन राशीत सायं. ५ वा. ४३ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस त्रयोदशी वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – बुध युतीयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, सिंह व तुला या राशीना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज काहींचा आराम करण्याकडे कल असणार आहे. मनोबल कमी असणार आहे. काहीजण करमणुकीकडे लक्ष देतील. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. शांत रहावे.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. आज आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामे यशस्वी होणार आहेत.
मिथुन : आजचा दिवस आपल्याला अनेकदृष्टींने अनुकूल असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दरारा निर्माण होईल.
कर्क : काहींना गुरुकृपा लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. नातेवाईकांच्या सहकार्याने एखादा प्रश्न सोडवू शकणार आहात. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. प्रवास सुखकर होतील.
सिंह : आज काहींना एखादी चिंता सतावणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आपण कोणत्याहीप्रकारचे वाद विवाद टाळावेत. आपल्याला मनस्ताप संभवतो. शांत व संयमी रहावे.
कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता अनुभवण्यास मिळेल.
तुळ : आपल्याला आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आपले मन अशांत असणार आहे. अनावश्यक खर्च कराल. तुमचा वेळ वाया जाणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
वृश्चिक : आपल्या मुलामुलींकडे विशेष लक्ष देणार आहात. त्यांच्याकरिता वेळ देणार आहात. मित्र, मैत्रिणी व आपले सहकारी यांच्याबरोबर सुसंवाद साधणार आहात. काहीजण जुन्याआठवणीत रममाण होणार आहेत.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्ही निवांत राहणार आहात. आनंदात दिवस व्यतीत करणार आहात. तुमचे मन आनंदी राहील. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे तुम्ही मार्गी लावणार आहात.
मकर : नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी रहाल. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
मीन : उत्साही रहाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. एखादी घटनेमुळे आपले मन आनंदून जाणार आहे.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४