आजचा दिवस राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, फाल्गुन शुक्ल सप्तमी, गुरुवार, दि. ६ मार्च २०२५, चंद्र – वृषभ राशीत, नक्षत्र – रोहिणी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४५ मि.

नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. ११ प. चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, चंद्र – गुरु युतीयोग, चंद्र – शुक्र लाभयोग व चंद्र – शनि केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष – आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभणार आहे. तुम्हाला सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.

वृषभ – नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.

मिथुन – कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे.

कर्क – व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. थोरामोठ्यांचे चांगले मार्गदर्शन लाभणार आहे. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

सिंह – व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे. कौटुंबिक क्षेत्रात, नोकरी व सार्वजनिक कामात कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस शक्यतो टाळावे.

Advertisement

कन्या – काहींना प्रवासाचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.

तुला – कामाचा ताण पडेल. जबाबदारी वाढणार आहे. कटू बोलणे टाळावे. गडी, कर्मचारी यांच्याशी मतभेदाची शक्यता आहे.

वृश्‍चिक – जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. उत्साह, उमेद वाढेल.

धनु – शत्रूपिडा जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वाहने चालवताना काळजी घ्यावी. वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे.

मकर – मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. प्रतिष्ठा लाभणार आहे.

कुंभ – गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे व्यवसायातील अंदाज व निर्णय योग्य ठरणार आहेत व त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे.

मीन – काहींना प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. अंदाज बरोबर ठरतील. वाटाघाटी परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होणार आहे.

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!