आजचा दिवस राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन शुक्ल चतुर्थी, रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४, चंद्र – तुला राशीत सायं. ५ वा. ३४ मि. पर्यंत नंतर वृश्चिक राशीत, नक्षत्र – विशाखा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २२ मि.

नमस्कार आज चंद्र तुला राशीत सायं. ५ वा. ३४ मि. पर्यंत रहात असून नंतर तो वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस विशाखा वर्ज्य दिवस आहे. आज रवि – शनि षडाष्टकयोग व बुध – मंगळ केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : आज आपण आपली दैनंदिन कामे शक्यतो दुपारपुर्वी उरकून घ्यावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवेल. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो.

वृषभ : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने सावकाश व जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.

मिथुन : दुपारनंतर काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. प्रवास नकोत. महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार आहेत.

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींचा बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहणार आहे.

सिंह : तुम्ही आपली कामे पूर्ण करणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आत्म विश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील.

Advertisement

कन्या : आर्थिक कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित पणे नातेवाईक भेटतील. प्रवासाचे योग संभवतात. चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

तुला : दुपारनंतर अनपेक्षितपणे धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे.

वृश्चिक : दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल चांगले ठेवावे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

धनु : आज काहींची चिडचिड होणार आहे. दुपारनंतर एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे.

मकर : आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल जाणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. महत्वाची कामे होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कुंभ : तुम्ही अधिक जबाबदारीने वागणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. मानसिक स्वास्थ्य जपावे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल.

मीन : दुपारनंतर काहींचा उत्साह वाढेल. प्रवास होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दुपारनंतर तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल.

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!