आजचा दिवस : राशिफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, चैत्र कृष्ण दशमी, शुक्रवार, दि. ३ मे २०२४, चंद्र – कुंभ राशीत, नक्षत्र – शततारका, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ११ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. ०० मि.
नमस्कार आज चंद्र कुंभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दु. १ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग, चंद्र – शुक्र लाभयोग व चंद्र – शनी युतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशीना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज काहीजणांना प्रियजन भेटल्याने विशेष आनंद होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : दैनंदिन कामांत सुयश लाभणार आहे. आज तुमचं उत्साह व उमेद विशेष असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी प्राप्त होणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. स्वास्थ्य लाभेल.
कर्क : दैनंदिन कामात काही अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींच्या मनावर कसलेतरी भावनिक दडपण राहील. प्रवास शक्यतो आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा.
सिंह : सौख्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. काहींचा आज धार्मिक कार्यात सहभाग राहील. तर काहीजण मनोरंजन व करमणुकीकडे रमणार आहेत. वाहने जपून चालवावित.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवासातुन फायदा मिळेल. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक : आज तुमचे मन अत्यन्त आनंदी व उत्साही राहणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य सुधारणार आहे. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनु : आज तुम्ही अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आपले मनोबल उत्तम राहणार आहे. प्रवास होतील.
मकर : कौटुंबिक जीवनात आज एखादी आनंददायी घटना घडणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आज काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कुंभ : आज आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. गेले दोन दिवस रखडलेली कामे तुम्ही आज मार्गी लावू शकणार आहात. आनंदी रहाणार आहात.
मीन : आज आपले मन धार्मिक गोष्टींमध्ये रमेल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. काहींचा मात्र आराम करण्याकडे कल राहील. दैनंदिन कामात आ आपले लक्ष लागणार नाही. प्रवासात काळजी हवी.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४