परशुराम जयंती
११ मे रोजी परशुराम जन्मोत्सव
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे शनिवार दिनांक 11 मे रोजी शाहू कला मंदिर येथे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला निवृत्त सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ऍनलायझर या चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यानही होणार आहे. या व्यतिरिक्त भागवताचार्य परमपूज्य हरिभाऊ निठुरकर महाराज आणि सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला आहे.
सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन, अखिल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले आणि महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.