उष्णतेची लाट
आशिया खंडच
उष्णतेच्या लाटेत सापडला
पुणे – यंदा अक्षरशः भाजून काढणारा उन्हाळा जाणवत आहे. केवळ पुणे, मुंबईच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडच उष्णतेच्या तडाख्यात सापडलेला आहे.
तापमान विषयक ताजी आकडेवारी पाहिली तर मॅन्मार मध्ये ४५, भारत ४४.०५, नेपाळ ४२.०२, चीन ४१.०९, बांगला देश ४२.०८ सेल्सिअस असे सध्या सरासरी तापमान आहे. तापमानाची ४० अंश सेल्सिअस ही मर्यादा या देशांनी ओलांडलेली आहे. त्या तुलनेत सिंगापूर आणि इंडोनेशिया येथे कमी तापमान आहे. सिंगापूर ३६.०५, इंडोनेशिया ३३ अंश सेल्सिअस असे तापमान आहे.
कॅनडास्थित हवामान आणि पर्यावरण विषयक संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुढी पाडव्यापासूनच पुण्यात ४१ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान आहे.