देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्प
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्प
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्वच घटकांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
वैयक्तिक करदात्यांना आता 12 लाख रु उत्पन्न करमुक्त केले आहे. 70 वर्षात कोणत्याही सरकारने केले नाही असे ऐतिहासिक काम भाजप सरकारने केले आहे. याचा फायदा 10 कोटी करदात्यांना होणार आहे. प्रत्येक करदात्याची सुमारे 72000 रुपरे कराची बचत होणार आहे. जेष्ठ नागरिकांना आता र1 लाख पर्यंत बँक व्याज TDS पासून मुक्त होणार आहे. याचबरोबर 6.50 लाख पर्यंतच्या घर किंवा दुकान भाड्यावर TDS लागणार नाही
MSEM उद्योजकांना 10 कोटी रुपयाचे कर्ज केंद्र सरकारच्या गॅरंटी ने मिळणार तसेच
किसान क्रेडिट कर्ज कार्डाची मर्यादा 3 लाखावरून रु 5 लाख, युरिया व ईतर खतांच्या देशांतर्गत उत्पादनासाठीही 50 खत निर्मिती कारखाने देशात उभारणार, डाळी उत्पादनात देश आत्मनिर्भर होण्यासाठी 6 वर्षाचा आराखडा आखून शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत केली जाणार आहे.
पर्यटनाला प्राधान्य यासाठी देशातील 50 destinations ची निवड, देशात या पाच वर्षात मेडिकलच्या 75000 सीट्स वाढविणार याच बरोबर IIT सीट्स वाढविणार असे अनेक जनकल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्यासह सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे.
शिवेंद्र सिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री