शासकीय कार्यालयांवरील नामांतर फलकांचे अनावरण
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध शासकीय कार्यालयांवरील नामांतर फलकांचे अनावरण
सातारा दि.25- पाटण येथील विविध कार्यालयांचे नामांतरण करण्यात आले आहे. या नामांतर फलकांचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनीष मोरे आदी उपस्थित होते.
पाटण येथील पंचायत समितीचे लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण, लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय व कै. सौ. वत्सलादेवी देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटण असे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतर फलकाचे अनावरण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले.
0000