आजचा दिवस : राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, मोक्षदा एकादशी, गीताजयंती, बुधवार, दि. ११ डिसेंबर २०२४, चंद्र – मीन राशीत स. ११ वा. ४८ मि. पर्यंत नंतर मेष राशीत, नक्षत्र – रेवती स. ११ वा. ४८ मि. पर्यंत नंतर अश्विनी, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०१ मि.
नमस्कार आज चंद्र मीन राशीत स. ११ वा. ४८ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दु. २ पर्यंत चांगला दिवस आहे. आज चंद्र – शुक्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ- स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे.
मिथुन : उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक प्रभाव राहील. दुपारनंतर प्रियजनांकडून विविध लाभ होणार आहेत. प्रवासात फायदा होणार आहे.
कर्क : चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत.
सिंह : मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल.वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग कमी होईल. दुपारनंतर प्रियजन भेटणार आहेत.
कन्या : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडेल.
तुला : अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दुपारनंतर वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.
वृश्चिक : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. काहीजण मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहेत.
धनु : दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी रहाल. प्रसन्नता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील.
मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होणार आहेत.
मीन : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर कुटूंबाकरिता वेळ देऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० ते या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054