राज्य नाट्य स्पर्धा:निकाल जाहीर
राज्य नाट्य स्पर्धेत सातारा केंद्रातून ‘लेबल’ प्रथम
मुंबई, दि. ११
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत सातारा केंद्रातून निर्मिती नाट्य संस्था, सातारा या संस्थेच्या लेबल या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच शाहू कला अकादमी, सातारा या संस्थेच्या ‘असे कधी होत नाही’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सातारा केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
पुण्यशील सुमित्रा राजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा या संस्थेच्या ‘फायनल ड्राफ्ट’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिका प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन, प्रथम पारितोषिक डॉ. निलेश माने (नाटक- लेबल), द्वितीय पारितोषिक राजीव मुळ्ये (नाटक. असं कधी होत नाही),
प्रकाश योजना प्रथम पारितोषिक संतोष बिदे (नाटक- अबूटभर), द्वितीय पारितोषिक मनोज वर्मा (नाटक- असे कधी होत नाही),
नेपथ्य प्रथम पारितोषिक सुरज बाबर (नाटक स्री-अंत्यकथा), द्वितीय पारितोषिक अभिजीत पवार (नाटक लेवाल),
रंगभूषा प्रथम पारितोषिक प्रशांत इंगवले (नाटक सावली), द्वितीय पारितोषिक डॉ. सुचेता माने (नाटक लेबल)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अमित देशमुख (नाटक फायनल ड्राफ्ट) व स्नेहा घडवई (नाटक लेबल),
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे धनश्री भिडे (नाटक असे कभी होत नाही), शुभदा कुलकर्णी (नाटक ब्लाईंड गेम), अपूर्वा कुलकर्णी (नाटक स्री-अंत्यकथा), निलोफर कारभारी (नाटक ध्यानी मनी), कुलदीप मोहिते (नाटक असं कधी होत नाही), सचिन सावंत (नाटक लेबल), अमितकुमार शेलार (नाटक- ३ फुल्या ३ बदाम), रोहित भोसले (नाटक ऐन चौकीत अध्यो रात्री)
श्री छ शाहू कला मंदिर, सातारा येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक महणून डॉ. समीर मोने, श्रीमती ज्योती निसज आणि श्री. मुकुंद हिंगणे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले .