आजचा दिवस
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण द्वितीया, करिदिन, बुधवार, दि. १५ जानेवारी २०२५, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य स. १० वा. २८ मि. पर्यंत नंतर आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २० मि.
नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस करिदिन वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – गुरु लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क,कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज आपण आपल्या घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहून दैनंदिन कामे पूर्ण करणार आहात. प्रवासाचे सुखकर होतील.
वृषभ : कामाचा ताण कमी होईल. नोकरी, व्यवसायात आपला प्रभाव वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. प्रवासात आनंददायी घटना घडेल. मनोबल उत्तम असणार आहे.
मिथुन : आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. गुप्तवार्ता समजणार आहेत. अपेक्षित फोन व पत्रव्यवहार होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहणार आहे.
कर्क : दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण नियोजलेली सर्व कामे आपण पूर्ण करु शकणार आहात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील.
सिंह : कामाचा ताण वाढणार आहे. काहींची अनावश्यक पळापळ होणार आहे. मानसिक अस्वास्थ्यामुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
कन्या : आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे.
तुला : दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आपणाला सुयश लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. तुम्ही जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपल्या दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.
धनु : आज आपण वादविवादात सहभाग तलाव. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आपल्याला दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रवास आज नकोत.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दैनंदिन जीवनात काही सुखद अनुभव येणार आहेत.
कुंभ : कामाचा ताण राहील. आपले मनोबल कमी असणार आहे. मानसिक उद्विग्नता जाणवणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन आज नको. वाहने सावकाश चालवावित.
मीन : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४
https://www.facebook.com/share/p/1B6tmuVYdL/