कोंडवे गोळीबार प्रकरणी एकजण ताब्यात
कोंडवे गोळीबार प्रकरणी एकजण ताब्यात
सातारा दि २८ प्रतिनिधी
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक जखमी झाले. ही घटना कोंडवे ता. सातारा येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेनंतर तेथील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यानुसार यामधील संशयित तुषार प्रल्हाद धोत्रे रा. सातारा याला काही वेळातच ताब्यात घेण्यात आले. या घटनेतील अन्य साथीदारांस जेरबंद करण्यासाठी पोलिसांची चार पथके शोध घेत आहेत. याशिवाय साताऱ्यासह जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली असल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. निलेश तांबे यांनी सांगितले.
जावली तालुक्यातील कास मार्गावरील जयमल्हार रिसॉर्ट येथे दि. ८ डिसेंबर २0२४ रोजी बारबाला नाचत असताना किरकोळ कारणांवरुन मारामारी झाली. या घटनेत धीरज शेळके याच्या डोक्यात बाटली फोडली. तेव्हापासून दोन्ही गटात धुमसत होतेच. त्यामुळे कालची घटना ही पूर्ववैमनस्यातूनच झाली आहे.
साताऱ्यासह जिल्हाभरात नाकाबंदी ही करण्यात आली आहे. त्यामुळे या गोळीबार करणाऱ्यांचे व त्यांना साथ देणारे संशयित लवकरच ताब्यात येईल. या घटनेतील सर्व घटनांच्या शक्यता विचारात घेवून विविध मार्गावर ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये विशेषत: स्कार्पधारकांची अधिक चौकशी केली जात आहे. यामध्ये संशय अधिक वाढल्यास त्याला तपासासाठी ताब्यात घेतले जात आहे. उद्यापर्यंत यामधील सर्व संशयित पोलिसांच्या ताब्यात येतील.