दलित चेंबर पुणे अध्यक्षपदी बनसोड
दलित चेंबर पुणे अध्यक्षपदी बनसोड
पुणे : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(डिक्की) पुणे च्या अध्यक्षपदी ललित बनसोड यांची निवड करण्यात आली आहे .
उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बनसोड यांची निवड करण्यात आली आहे.डिक्की ही देशभरातील दलित उद्योजकांची शिखर संस्था आहे . डिक्की च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे उपस्थित होते. यावेळी डिक्की चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर ,माजी अध्यक्ष राजू साळवे ,अविनाश जगताप यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) चे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी सर्वानुमते बनसोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.