कास पठारावर फुले
कास पठारावर फुले उमलण्याच्या हंगामासाठी सुरुवात
सातारा – सध्या कास पठारावर पावसाचे प्रमाण कमी झाले असून वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर पावसाच्या उघड-झापमुळे पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे कास पठार कार्यकारी समितीने तातडीने हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात १० सप्टेंबरनंतर कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइनची सुविधा https://www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दीडशे रुपये, गाईड फी ४५ मिनिटाकरता शंभर रुपये, उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
शालेय मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणे बंधनकारक असणार आहे यासाठी महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र सक्तीचे करण्यात आले आहे.