आजचा दिवस


आजचा दिवस

शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल चतुर्थी, विनायक चतुर्थी ( अंगारक योग ), मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५, चंद्र – मेष राशीत दु. ४ वा. ३० मि. पर्यंत नंतर वृषभ राशीत , नक्षत्र – भरणी स. ११ वा. ०७ मि. पर्यंत नंतर कृत्तिका, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३४ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५१ मि.

नमस्कार आज चंद्र मेष राशीत दु. ४ वा. ३० मि. पर्यंत रहात असून नंतर तो वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. ११ पर्यंत चांगला दिवस आहे. आज चंद्र – मंगळ, चंद्र – बुध, चंद्र – शुक्र व चंद्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : आर्थिक बाबतीत आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. विशेषतः संध्याकाळी काहींना आर्थिक लाभ सभवतात. तुम्ही उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे यशस्वी कराल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : मनोबल कमी असणार आहे. सकाळी सकाळी आपली एखाद्या बाबतीत चिडचिड होणार आहे. काहींना निरुत्साह जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी.

मिथुन : काहींना आज आर्थिक लाभ होतील. अचानक धनलाभ संभवतो. मात्र त्याचबरोबर काहींना आज संध्याकाळी एखादा अनावश्यक खर्च करावा लागेल. मित्रमैत्रिणी भेटतील.

कर्क : तुमचे मनोबल उत्तम असल्याने आज तुम्ही अनेक कामात सुयश मिळवणार आहात. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी लाभेल. मनोबल वाढणार आहे.

सिंह : मानसिक सकरात्मकता राहील. आनंदी व आशावादी रहाल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल. प्रवासाकरिता आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील.

Advertisement

कन्या : मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवेल. आज काहींना मनस्ताप संभवतो. अकारण वादविवादात सहभाग टाळावा. वाहने सावकाश चालवावीत. संध्याकाळी तुमचा उत्साह वाढविणारी घटना घडेल.

तुला : जिद्दीने कार्यरत रहाल. आजची आपली दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे आपण शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. प्रवास सुखकर होतील. सायंकाळनंतर काहींना निरुत्साह जाणवेल.

वृश्चिक : अकारण काही खर्च होतील. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनावश्यक कामे करावी लागतील व त्यामुळे तुमची दैनंदिन कामे रखडणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : काहींना जुन्या आठवणी त्रास देतील. आपण आज आपले मन नवीन विचारात गुंतवावे. वैचारिक परिवर्तन होईल. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. मनोबल कमी राहील.

मकर : प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी संधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना नवीन कल्पना सुचतील. नवा मार्ग दिसेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

मीन : कौटुंबिक वातावरण आनंदी असल्याने आज तुम्ही विशेष उत्साही रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.

आज मंगळवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 982230305


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!