सण आनंदाचा.. मांगल्याचा..गुढीपाडवा..!


सण आनंदाचा.. मांगल्याचा..

गुढीपाडवा..!

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय व समृध्दीचे प्रतीक आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.गु

ढीपाडव्याचे महत्त्व

गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते.

Advertisement

सकाळी मुहूर्ताच्या वेळी गुढी उभी करावी आणि सूर्यास्त होण्याआधी तिचे पूजन करावे, त्यानंतर गुढी उतरवावी. गुढी उभारताना यावेळी दारावर आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. गुढी उभारताना वेळूची काठी आणून ती धुवावी आणि स्वच्छ वस्त्र आणि सुगंधित फुलांची माळ त्यावर तांब्या अथवा फुलपात्र ठेवावे. बत्ताश्याची माळ घालावी आणि कुटुंबियांबरोबर गुढीची पूजा करावी. सायंकाळी सूर्यास्त होण्याआधी गुढीचे पूजन करून उतरवण्याची परंपरा आजही महाराष्ट्रात पाळली जाते.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!