निवडणूक कार्यक्रम जाहीर
लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजपत्रित अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी जारी होणार
12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघ आणि मध्य प्रदेशातील या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार
12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024