alt+Ctrl+delete: डॉ.समिधा गांधी
Alt+Ctrl+delete
पंचवीस एक वर्षांपूर्वी जेव्हा मी नव्याने कॉम्प्युटर शिकायला लागले होते तेव्हा मला शिकवले होते की कधीही कॉम्प्युटर हॅंग झाला की alt+ctrl+delete या तीनही keysएकाचवेळी दाबायच्या की नंतर कॉम्प्युटर बंद होतो आणि पुन्हा सुरू होतो.
मला आश्चर्य वाटले होते.
नंतर कधीतरी विचार करताना जाणवले की माणसाला जे तंत्रज्ञान मशीनमध्ये वापरता आले ते स्वतःच्या बाबतीत पण जमले तर आयुष्य किती सोपे होईल.
एखादी घटना मनाविरुद्ध घडली किंवा एखाद्या अनपेक्षित, धक्कादायक प्रसंगामुळे आपण सुन्न होतो. आपल्याला आता काय करावे सुचत नाही म्हणजेच आपला मेंदू hang होतो.
अशावेळी आपण जर आपल्या मेंदूला पहिली alter म्हणजेच विचारपद्धतीत किंवा तिथल्या परिस्थितीत काय बदल घडवून आणता येईल ते पहावे.
उदाहरणार्थ ,शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असेल तर विजेचा पुरवठा बंद करणे . म्हणजेच परिस्थितीत बदल घडवून आणणे.
कधी कधी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करावे लागतात तर कधी रुढी ,परंपरा पण बदलाव्या लागू शकतात.
नंतर असते ती control ची सुचना! म्हणजे काय तर परिस्थितीवर ताबा मिळवणे .
प्रत्येक वेळी काहीतरी अपघातच घडला असेल असे नाही. कदाचित कधीतरी आपल्या मनाविरुध्द एखादी घटना घडलेली असू शकते. आपला कोणीतरी अपमान केलेला असू शकतो . अशावेळी आपल्याला मनावर, रागावर control म्हणजेच ताबा मिळवता आला पाहिजे.
शेवटची सुचना असते ती delete ची! म्हणजे काय तर आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या घटना, आठवणी आपल्या मेंदूतून काढून टाकणे.
अगदी चुकीच्या सवयी देखील डिलीट करण्याचा प्रयत्न करणे.
- या तीनही keys आपल्याला योग्य वेळी वापरता आल्या की काय होईल?आपला मेंदू reboot होऊन नव्या दमाने ,नव्या जोमाने कामाला लागेल.
पुढच्यावेळी जेव्हा केव्हा मेंदू काम करेनासा होईल तेव्हा नक्की ही alt+Ctrl+delete:ची त्रिसूत्री नक्की वापरात आणा.
आयुष्य सुंदर आहेच ते आणखी सुंदर होईल.
डॉ.समिधा गांधी.