दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी – नागराजन


दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी
– याशनी नागराजन
सातारा (जिमाका) : जिल्हा प्रशासनाकडुन सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तीसाठी किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी सांगितले दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा, व्हिलचेअरची सुविधा, वाहतुकीची सुविधा, ईव्हीएममध्ये ब्रेलची सुविधा, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी अडथळा विरहित प्रवेशाची व्यवस्था, दिव्यांग व अतिवृद्ध्द (८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक) मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा, दिव्यांग (अंध व अल्पदृष्टी) मतदारासाठी भिंगाची सोय (Magnifying Glass), दिव्यांग मतदारांसाठी वेगळी रांगेची सुविधा इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढविणेसाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका व यामध्ये दिव्यांग संघटनांचे अभिप्राय व सहकार्य घेणेसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणा-या संघटना समवेत SEEVP चे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा याशनी नागराजन (भा.प्र.से.) यांचे अध्यक्षतेखाली दि.१५ एप्रिल २०२४ रोजी स्थायी सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे बैठक पार पडली.
दिव्यांग मतदारांनी सक्षम मोबाईल अॅप व पोस्टल बॅलेट सुविधेचा वापर करणेबाबत आवाहन केले. दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी दिव्यांग संघटनांनी त्यांचे अभिप्राय देखील नोंदविले. सदर अभिप्रायानुसार जिल्हा प्रशासनाकडुन अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्रीमती नागराजन यांनी संघटना प्रतिनिधींना आश्वासित केले. दिव्यांग संघटनांनी त्यांचे स्तरावरुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याबाबत आवाहन केले.
सदर बैठकीसाठी निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) तथा नोडल अधिकारी (PWBD)) सातारा जिल्हा परिषद, सातारा, अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारों (ग्रा.पं.वि.) जिल्हा परिषद, सातारा, नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सातारा, डॉ. सपना घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा तसेच जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्राचे समन्वयक गौरव जाधव, उपस्थित होते. दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी कृष्णा पवार, नारायणा निकम, नामदेव इंगळे, अविनाश कुलकर्णी, अक्षय बाबर,अमोल कारंडे, प्रविण डांगे, समिना शेख, दीपक खडंग, सुरेश माने, राजेंद्र पवार, नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे इत्यादी उपस्थित होते.
डॉ. घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी बैठकोसाठी उपस्थित अधिकारी व संघटना प्रतिनिधी यांचे आभार मानले.
00000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!