आवाहन जागतिक वारसा दिन
‘जागतिक वारसा दिन’ 2024
आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळाबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. .याच दिवसाचे औचित्य साधून सातारा स्थित *जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था* सातार्यातील ऐतिहासिक स्थाळाच्या ठिकाणी “हरीटेज वॉक ” चे आयोजन करित असते .यंदा या हेरीटेज वॉकचे दहावे वर्ष आहे .
या उपक्रमाची दशकपूर्ती निमित्ताने यावर्षी देखील जिज्ञासा संस्था व महाराणी येसूबाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी हेरिटेज वॉक आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही संस्थांनी नुकतेच *महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्थळाचे संशोधन* पूर्ण केले आहे. तसेच शासन सदर स्मारकाचे राज्य सुरक्षित यादीत समावेश व्हावा यासाठी देखील पाठपुरावा केला . संस्थांच्या या प्रयत्नांना यश येऊन शासनाने सदर स्मारक हे *राज्य सुरक्षित स्मारक* म्हणून घोषित केले असून लवकरच या स्मारकाचे संवर्धनाचे कामास सुरुवात होणार आहे.
सातारची संगम माहूली म्हणजे अत्यंत कलात्मकतेने उभारलेल्या मंदिरांची मांदियाळी आहे. त्याचबरोबर राजधानी साताऱ्याचे निर्माते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ,यांच्या मातोश्री येसूबाई साहेब, पत्नी सगुणाबाई , महाराणी ताराबाई यांसारख्या ऐतिहासिक महत्त्व असलेली समाधी स्थळे या ठिकाणी आहेत.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून या ठिकाणच्या समाधी स्थळांची, मंदिरांची घाटांची ऐतिहासिक माहिती लोकांना लोकांना व्हावी म्हणून या ठिकाणी हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सातारकर इतिहास प्रेमी नागरिकांनी सदर उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती .
♦️वेळ दिनांक 18 एप्रिल दुपारी 3.30 वाजता
♦️एकत्र जमण्याचे ठिकाण काशीविश्वेश्वर मंदिर संगम माहुली
*आयोजक*
🔴महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा
🔴जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था सातारा
🔴छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा
.