महायुतीला दलित महासंघाचा पाठिंबा
दलित महासंघ,पॅंथरचा
उदयनराजेंना जाहीर पाठींबा
सातारा
दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती मित्रपक्ष व भाजपचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत दलित महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी महायुती चे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिलेल्या पाठिंब्या संदर्भात माहिती दिली.
दरम्यान दलित पँथरचे राज्याध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनीही खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.
देसाई म्हणाले,गेल्या अधिवेशनात दलित महासंघाच्या वतीने काढलेल्या मोर्चाला सामोरे जाऊन मातंग समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सकटे यांना देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्राध्यापक डॉक्टर सकटे यांची बैठक झाली. या बैठकीत मातंग समाजाच्या प्रलंबित विविध मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी मान्य केल्या. तसेच शिंदे सरकारला साथ देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला. त्यानंतर शिंदे सरकारचे काम पाहून दलित महासंघाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर सकटे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.
प्रा.मच्छिंद्र सकटे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्टी च्या धरतीवर आर्टी ही मातंग समाजासाठी संस्था सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुणे येथे लहुजी वस्ताद राष्ट्रीय स्मारक उभारणे ,अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपर येथील चिरागनगर येथील निवासस्थानाचे स्मारक करणे यासाठी निधी मंजूर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख केला.आज पर्यंत कोणी ही असा उल्लेख केला नव्हता. याशिवाय आरक्षणासंदर्भात आमच्या मागण्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची ही मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केले. या सगळ्या घटनांची साक्षीदार शंभूराज देसाई आहेत. त्यांनी शिंदे सरकारला साथ द्या, असे आवाहन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच शंभूराज देसाई यांचे विचार पटल्याने आपण शिंदे सरकारला तसेच लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आमदार महेश शिंदे, अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नितीनकाका पाटील, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, पुरुषोत्तम जाधव, माजी आमदार कांताताई नलावडे,भाजप पदाधिकारी सुरभी भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित कदम, सचिन नलावडे, युवराज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.