पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा..सूचना
पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता
पार्किंग, वाहतुक बदल व सभेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत
सातारा : दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी मौजे सैदापुर, ता. कराड, जि. सातारा येथे पंतप्रधान, भारत सरकार यांची कराड येथे सभा होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सभेकरीता येणा-या लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, लोकांच्या सोयीकरीता तसेच सुरक्षिततेकरीता सूचना देण्यात येत आहेत. वाहतुकीकरीता बंद करण्यत येणारे मार्ग दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासुन पंतप्रधान, भारत सरकार यांची सभा संपेपर्यंत सैदापुर कॅनॉल ते ओगलेवाडी रोड-गणपती मंदीर हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस कोणतेही वाहने पार्क करता येणार नाहीत. सुर्ली घाट- विटा मार्गे तसेच शामगाव घाट मार्गे कराडकडे कोणत्याही प्रकारचे जड वाहन एस.टी बस, यांना करवडी फाटा-ओगलेवाडी-सैदापुर कॅनॉल हा रोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. सैदापुर कॅनॉल-कृष्णा सर्कल-विजयदिवस चौक-भेदा चौक पोपटभाई पेट्रोलपंप चौक- कोल्हापूर नाका-ढेबेवाडी फाटा-कृष्णा हॉस्पीटल या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस कोणतेही वाहने पार्क करता येणार नाहीत. कृष्णा हॉस्पीटल-ढेबेवाडी फाटा-खरेदी विक्री पेट्रोलपंप कोल्हापूर नाका युटर्न-कोयनामोरी- महत्मागांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजयदिवस चौक-कृष्णा सर्कल-सैदापुर कॅनॉल या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस कोणतेही वाहने पार्क करता येणार नाहीत. चिपळून-पाटण-ढेबेवाडी-उंडाळे-तासगाव-इस्लामपूर-या बाजुकडून येणारी व विटा-औधं- पुसेसावळी बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कराड शहरात प्रवेश न करता हायवेवरुन-तासवडे-शिरवडे-मसुर-शामगाव घाट मार्गे विटा-औंध-पुसेसावळी बाजुकडे जातील. अत्यावश्यक वैद्यकिय सेवा (अॅम्ब्युलन्ससाठी) सैदापुर कॅनॉल-गणपती मंदीर-ओगलेवाडी रोड हा मार्ग बंद राहील त्या ऐवजी सैदापुर कॅनॉल-बनवडी फाटा-गजानन हौसिंग सोसायटी-गणपती मंदीर ओगलेवाडी चौक-करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा.
*वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग*
विटा-सुर्लीघाट मार्गे तसेच शामगाव घाट मार्गे कराडमध्ये येणारी एसटी जड वाहने ही मसूर-उंब्रज- तासवडे टोलनाका-हायवेने कोल्हापूर नाका मार्गे कराड मध्ये येतील. ओगलेवाडी रेल्वेस्टेशन कडील वाहने ही ओगलेवाडी चौक एमएसईबी बनवडी-बनवडी फाटा-कोपर्डे-सहयाद्री साखर कारखाना-शहापूर फाटा-शिरवडे-तासवडे-वहागाव मार्गे हायवेने कोल्हापूरनाका मार्गे कराड मध्ये येतील.
*सभेकरीता येणाऱ्या वाहनांची पार्किंग ठिकाणे*
*चारचाकी वाहने पार्किंग*- सातारा बाजूकडून येणारी चारचाकी वाहने ही उंब्रज-मसूर-सहयाद्री साखर कारखाना- कोपर्डे-बनवडी फाटा-वेणुताई चव्हाण कॉलेज-शासकिय इंजिनिअरींग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत. सांगली जिल्हयातून विटा-कडेगाव मार्गे व सातारा जिल्हयातून औंध-पुसेसावळी या मार्गवरुन येणारी चारचाकी व दुचाकी वाहने ही करवडी फाटा-ओगलेवाडी मार्गे गजानन हौंसिंग सोसायटी येथील सुर्या फर्निचरपासून पुर्वेस असणाऱ्या अमर जाधव यांचे शेतात मैदानावर पार्क करावीत. चिपळून-पाटण-ढेबेवाडी-उंडाळे बाजुकडून सभेकरीता येणारी चारचाकी वाहने ही कोल्हापूर नाका-युटर्न-कोयनामोरी-महात्मा गांधी पुतळा पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक- विजयदिवस चौक-कृष्णा सर्कल-सैदापुर कॅनॉल-एस.जी.एम. कॉलेज पाठीमागे-हॉली फॅमिली येथील पैसा फंड व लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत.
*दुचाकी वाहने पार्किंग*- इस्लामपूर-तासगाव-उंडाळे-ढेबेवाडी-पाटण या भागातून सभेकरीता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापूर नाका युटर्न-कोयना मोरी-महात्मागांधी पुतळा पोपटभाई पेट्रोलपंप भेदाचौक- विजयदिवस चौक- कृष्णा सर्कल सैदापुर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत. सातारा उंब्रज बाजुकडून येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज, विद्यानगर येथे पार्क करावीत. तरी सभेकरीता येणाऱ्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की, वाहतुक मार्गामध्ये करण्यात आलेल्या बदलाबाबत जागरुक रहावे व सभेकरीता देण्यात आलेल्या पार्किंग प्रमाणे आपली वाहने पार्क करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सभेकरीता येताना लोकांनी सोबत सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅग/सॅक/पिशवी, पाणी बॉटल/प्लॅस्टीक बॉटल / पेये, कोणतेही खाद्यपदार्थ आणू नयेत. अशा प्रकारच्या वस्तु सोबत घेवुन आल्यास सभेकरीता प्रवेश दिला जाणार नाही असे समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा यांनी कळविले आहे.
00000000