साताऱ्यात भाजपाचे आंदोलन


 

साताऱ्यात भाजपाचे आंदोलन

आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून केला निषेध

राहुल गांधीनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले, भारतीय जनता पार्टीने राज्यभर राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे विरोधात आंदोलन केले, आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा आणि इंडी आघाडीचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे. आरक्षण रद्द करून संविधानावर गदा आणू पाहणाऱ्या या विकृत मानसिकतेचा , साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम च्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले

राहुल गांधी अमेरिकेत गेले आणि त्या ठिकाणी भारत विरोधी पत्रकारांना मुलाखत देताना भारतातले आरक्षण बंद केले पाहिजे असे वक्तव्य केले, याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे धैर्यशीलदादा कदम यांनी स्पष्ट केले

वास्तविक पाहता लोकसभेच्या वेळेला, “संविधान खतरेमे”, “भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार” अशी बोंब मारून, खोटा नेरेटिव्ह पसरवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इंडि आघाडीने केला, त्यात यश न मिळाल्यामुळे बिथरलेल्या काँग्रेस आणि इंडी आघाडीने अनेक राज्यात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी याबाबतीत त्यांना यश सुद्धा मिळाले, परंतु प्रशासनाने तातडीने योग्य दखल घेऊन कारवाई केली , आणि आंदोलकांना ताब्यात घेतले

Advertisement

या सर्व गोष्टींमुळे मनस्थिती बिघडलेल्या राहुल गांधीनी अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा कुटील डाव खेळला, भारताच्या विरोधात असणाऱ्या अनेक नेत्यांच्या भेटी राहुल गांधीनी घेतल्या, भारत विरोधी असलेल्या अनेक पत्रकारांना मुलाखती दिल्या, आणि त्यातून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा घाणेरडा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, त्यातच त्यांनी भारतातले आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे असे वक्तव्य करून पुन्हा एकदा भारतात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, यातून काँग्रेसची नीच मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे

राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडी आघाडी यांनी कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत आरक्षण बंद करण्याचे विचारही राहुल गांधीनी मनात आणू नयेत, काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या बापालाही आरक्षण बंद करणे शक्य होणार नाही , असेही भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी निक्षून सांगितले

आंदोलनाच्या सुरुवातीलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी “भारत माता की जय”, “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “भारतीय संविधानाचा विजय असो” , अशा घोषणा देण्यात आल्या

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका, सातारा ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिषा शहा, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस शैलेंद्र कांबळे , नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे, राहुल शिवनामे, रवी आपटे, डॉ सचिन साळुंखे , जिल्हा चिटणीस कल्पना जाधव, महेंद्र कदम, निलेश शहा, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सरचिटणीस राज सोनावले, चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर ,  आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अजय मांढरे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!