पुणे:सलग तीन दिवस सुट्टी..मतदान किती होणार ?
सलग तीन दिवस सुट्टी
पुणेकर मतदान करणार की सहली?
पुणे – सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पुणेकर मतदानासाठी थांबतील की सहलीसाठी पळतील? अशी चर्चा आहे.
येत्या सोमवारी मतदान असल्याने सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. खाजगी कंपन्यांनीही या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. सेकंड सॅटर्डे, रविवार आणि सोमवारी निवडणूक असल्याने त्या दिवशी सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. अशी सलग सुट्टी आली की बरेच जण जवळपासची छोटी ट्रिप काढतात. ऐन मे महिन्यात ही पर्वणी मिळाली आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना मात्र, लोकांना पर्यटनापासून रोखायचे कसे? हा प्रश्न आहे.
पुण्याजवळ महाबळेश्वर, अलिबाग, दिवेआगर, लोणावळा अशा छोट्या सहली करण्याकडे लोकांचा कल आहे. त्यासाठी टॅक्सीज् खूप आधीपासूनच बुक झाल्या आहेत. बाहेर जाण्याचे बेत ठरवलेल्यांमधील बरेच जण येथील स्थायिक नाहीत. अनेकजण मतदान करूनच मग ट्रिपला जाणार आहेत. पण लॉंग लिव्हवर जे गेले आहेत, ते मतदानासाठी असणार नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात ४९टक्के मतदान झाले होते. यंदा २४ साली तेवढे तरी मतदान होईल का? याची शंका आहे.