सातारा शहर पोलिसांची कारवाई
सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
सातारा शहर पोलिसांची कारवाई
सातारा दिनांक 11 प्रतिनिधी
मंत्रालयात ओळख आहे असे सांगून आरोग्य विभागात नोकरी लावतो अशा भूलथापांद्वारे सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी स्वरूप उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे वय 35 राहणार बोरगाव याला अटक केली आहे .गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे
सन 2023 मध्ये शिंदे याने एका महिलेची ओळख काढून तिला मंत्रालयात आपली ओळख आहे तेथे आरोग्य विभागात नर्स म्हणून नोकरी लावतो असे सांगून तिच्यासह अन्य एकांकडून वेळोवेळी सहा लाख वीस हजार रुपये घेतले होते .परंतु कोणतीही नोकरी न देता त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली यामुळे फिर्यादींनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडू कर यांच्या आदेशाने सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तपासला सुरुवात केली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने या भामट्याची माहिती काढण्यात आली .
आरोपी अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता सातारा शहरासह तालुका तसेच अन्य ठिकाणी त्याचा कसून शोध घेण्यात आला सातारा शहर परिसरातच एका ठिकाणी आढळल्यानंतर डीबी पथकाने त्याला कौशल्याने ताब्यात घेतले .त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ऑनलाइन व रोख स्वरूपात पैसे घेतल्याचे सांगितले शिंदे याची कुठेही मंत्रालयात व आरोग्य विभागात ओळख नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडून भूलथापांच्या माध्यमातून पैसे उकळत असे या भामट्यावर यापूर्वी देखील अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत
या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे सुधीर मोरे निलेश यादव महेंद्र पाटोळे सुजित भोसले निलेश जाधव विक्रम माने पंकज मोहिते सचिन शिंदे इरफान मुलांनी संतोष घाडगे सागर गायकवाड यांनी कारवाईक भाग घेतला होता.
****