सातारा:निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी पूर्ण
खर्च निरीक्षक कुमार उदय यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी
सातारा
खर्च निरीक्षक कुमार उदय यांच्या उपस्थितीत 45 सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.
सदर तपासणीस एकूण 16 उमेदवारांपैकी १४ उमेदवार उपस्थित होते.
अनुपस्थित उमेदवारांना तसेच खर्चात तफावत असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत नोटीस देण्यात आलेली आहे व सदर नोटीसीचा खुलासा 48 तासांमध्ये करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे.
तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
$$