ऐतिहासिक चित्रपटातील नौटंकी थांबवा
ऐतिहासिक चित्रपटातील नौटंकी थांबवण्यासाठी कायदा पारित करावा
महाराणी येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांची मागणी
सातारा
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड गदारोळ सुरू असताना येसूबाई साहेबांच्या राजेशिर्के या पितृकुळातील सदस्य सातारचे माजी नगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी या चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या काही आक्षेपार्ह गोष्टींवर लक्ष वेधले आहे. आज पर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास दाखविताना जाणीवपूर्वक संभाजी राजांचे मेहुणे गणोजी राजेशिर्के यांना खलनायक ठरवले आहे. वास्तविक पाहता गुणोजी राजेशिर्के यांच्याविरुद्ध कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. याबाबत पुरातत्त्व विभागाने देखील निर्वाळा दिला आहे. त्यामुळे प्रदर्शित होऊ घातलेल्या छाव या चित्रपटात देखील याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार असेल तर सदर चित्रपट बंद पाडू असा इशारा दिला आहे.
याचबरोबर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर चित्रपट दाखवताना वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे केवळ सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली चुकीचा इतिहास प्रदर्शित होत असेल तर त्यावर लेडीज बंधन घालते काळाची गरज आहे . यासाठी स्वतंत्र कायदा पारित करावा अशी मागणी महाराणी येसूबाई फाउंडेशनचे प्रवक्ता सुहास राजेशिर्के यांनी केली आहे