उन्हाच्या नोंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
उन्हाच्या नोंदी
मुक्त छंदातील अप्रतिम आविष्कार
पुणे
८फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथे कवयित्री पल्लवी दिलीप पतंगे लिखित उन्हाच्या नोंदी या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा काव्यमय वातावरणात पार पडला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. सदर सोहळा सर्व रसिकांसाठी फेसबुक live करण्यात आला.
प्रकाशनासाठी साहित्यिक ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे,महाराष्ट्रातील ज्येष्ठ गजलकार प्रशांत वैद्य,आणि संपादक मधुसूदन पतकी उपस्थित होते.
यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उन्हाच्या नोंदी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले .
पल्लवी पतंगे यांच्या “उन्हाच्या नोंदी”हा संग्रह मराठी भाषेसंदर्भात चिंता व्यक्त करणाऱ्यांना अत्यंत रास्त उत्तर आहे असे चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ त्याचबरोबर स्नेही जनांची सोबत असेल तर उत्तम कविता, साहित्य निर्माण होते .पतंगे यांच्या काव्यसंग्रहात या खुणा ठिकठिकाणी दिसतात.हा संग्रह म्हणजे मुक्तछंदातील एक अप्रतिम आविष्कार आहे आणि प्रत्येक मराठी वाचकांच्या घरी हे पुस्तक पाहिजेच असे वानखेडे म्हणाले.
आपल्या मनोगतात प्रशांत वैद्य यांनी पतंगे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ते म्हणाले,
आपण किती लिहितो, त्यापेक्षा काय लिहितो, किती सकस लिहितो याचा वेध घेतला पाहिजे. संख्यात्मक लेखनापेक्षा गुणात्मक लेखन महत्वाचे. अधिकाधिक सत्वयुक्त लिखाण केले पाहिजे. हिंदी कवी दुष्यंत यांनी आयुष्यात पाऊणशेहुन कमी कविता लिहिल्या. मात्र हिंदी साहित्यात त्यांचे स्थान आढळ असल्याचे प्रशांत वैद्य यांनी यावेळी सांगितले.
वाल्मिकी ऋषींपासून सुरू झालेल्या साहित्य प्रांतातल्या या अक्षर दिंडीत पल्लवी पतंगे या वारकरी झाल्या आहेत, याचा आनंद आम्हाला आहे. त्यांच्या काव्यसंग्रहास खूप शुभेच्छा देत पल्लवी पतंगे यांना रंगरेषा, आकृती यातील मर्म समजतअसतानाच, शब्दाक्षरे सापडली आणि स्वतःचा शोध घेताना स्वतःलाही त्यांनी हुडकून काढले त्यामुळे त्यांच्या कविता या प्रत्येकाला आपल्या जवळच्या वाटतात असे प्रतिपादन मधुसूदन पतकी यांनी केले.
पुस्तक प्रकाशनाप्रसंगी सौ अनघा भुतकर, दिलीप पतंगे यांनी मनोगत व्यक्त केले.
विनोद सावंत, डॉक्टर मंदार खरे ,प्रणिता कुलकर्णी ,सौ नेहा चौधरी ,वैशाली माळी, प्रशांत वैद्य ,मधुसूदन पतकी, रसिका डोंगरे,अपेक्षा बिडकर यांनी उन्हाच्या नोंदी संग्रहातील कवितांचे अभिवाचन केले.
पल्लवी पतंगे यांनी आपल्या मनोगतात कविता लेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली . मार्गदर्शन करणाऱ्यांचा उल्लेख केला.
यावेळी पतंगे यांचे वडील विलास चवाथे यांनीही हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले.
मुखपृष्ठ निर्मिती करणाऱ्या पतंगे ह्यांच्या कन्या स्वरा पतंगे यांचा सत्कार चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच जावई सुदीप वाकडे ह्यांनी पूर्ण कार्यक्रमाचे चोख व्यवस्थापन होईल ह्याची काळजी घेतली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वैशाली माळी तर खुसखुशीत निवेदन व आभार रसिका डोंगरे यांनी मानले.
कार्यक्रमास विलास चवाथे,लता चवाथे,अमोल चवाथे,शीतल चवाथे,
अरुण भुतकर,अनघा भुतकर,मयुरी मुरांजन, निलय मुरांजन, सुरेखा वाकडे,ज्योती लोंढे,दीपा चुग,श्री व सौ खोत,श्री व सौ कुलकर्णी, श्री व सौ गाजरे,श्री व सौ कवडे,प्रज्ञा वैद्य,स्वाती सावंत,मंजिरी चौधरी,व्यंकटेश कुलकर्णी,श्री व सौ पारसे,रेवती पेंडसे,गिरिजा तरवडे, मिनाक्षी शिलावंत,शुभदा जोशी,अमोल पंडित,अजय कुलकर्णी
उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सांगतेला पल्लवी पतंगे ह्यांनी”काव्य रसिकांची “उन्हाच्या नोंदी” वर मायेची सावली निरंतर राहू दे!असे उद्गार काढले.