मधमाशांच्या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी


मधमाशांच्या हल्ल्यात सहा पर्यटक गंभीर जखमी

वाई

पांडवगड ता. वाई येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना वाईच्या शिवसह्याद्री बचाव पथकाच्या युवकांनी जंगलातून मोठ्या कसरतीने आणून वाई व सातारा येथे उपचारासाठी दाखल केले.

Advertisement

प्राचीन अशा वाईच्या पांडव गडाला अनेक पर्यटक इतिहास प्रेमी भेट देत असतात. या ठिकाणी इंदापूर येथील युवक आल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाल अवती, अमोल दंडवते, चैतन्य देवळे, संतोष जापे हे फिरणासाठी आले होत.े त्यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताज वाईच्या शिवसह्याद्री बचाव पथकाने राजेंद्र खरात व प्रशांत डोंगरे यांनी वाई पोलीस स्टेशनचे नितीन कदम व श्रीनिवास बिराजदार, आशुतोष शिंदे, रोहित मुंगसे, सौरभ जाधव, गुंडेवाडी, धावडी पंचक्रोशीतील युवक, महसूल विभाग, आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करून बचाव कार्य पार पाडले. गरवारे टेक्निकल फायबर यांनी तत्परतेने अँब्युलन्स पाठवली. पोलीस अधिकारी आरोग्य प्रशासकीय विभागाच्या मदतीने जखमींना वाई व सातारा आरोग्य विभागात उपचारासाठी दाखल केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!